महाराष्ट्रातल्या सर्व रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांची वेळोवेळी मी माहिती घेत आहे : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर
आज शिरोळ तालुक्यातील काही ग्रामीण रुग्णालयांना व प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन तेथील एकंदरीत परिस्थितीची पाहणी केली. तसेच सर्व अधिकारी व डॉक्टरांसमवेत कोरोना बाबतीत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. दत्तवड येथे सर्वप्रथम भेट देऊन तेथील अलगीकरण कक्षाची विशेष पाहणी केली. त्यानंतर सैनिक टाकळी, अकिवाट, टाकवडे व नांदणी या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देत उपाययोजनांबद्दल अधिक माहिती घेतली.
तसेच विविध ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चे दरम्यान सूचना व आदेश दिले. प्रत्येक रुग्णाची तपासणी करताना योग्य पद्धतीने विचारपूस करावी, आवश्यक असलेल्या गोष्टी तत्परतेने उपलब्ध करून द्याव्यात, असे मत ही यावेळी मांडले. तसेच काही रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.
याप्रसंगी डॉक्टर खांबे, दत्तवाड चे जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रविण माने, श्री. संजय परीट, श्री. डी. एन. सिदनाळे, श्री. राजू पाटील, श्री. उदय पाटील, श्री. चारुदत्त चौगुले, नांदणी पंचायत समिती सदस्या सौ. मीनाक्षी कुरडे, श्री. संजय बोरगावे, श्री. राजु कुरडे, टाकळीच्या सरपंच सौ. हर्षदा पाटील, श्री. रणजीत पाटील, श्री. अरुण पाटील, श्री. श्रीधर भोसले, श्री. इकबाल बैरागदार, श्री. आप्पासो बडबडे तहसीलदार गुरुजी, टाकवडेचे सरपंच श्री. प्रकाश पाटील, श्री. प्रकाश पाटील टाकवडेकर, श्री. अतुल चौगुले, गटविकास अधिकारी श्री. कवितके तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री. दातार व इतर मान्यवर उपस्थित होते.