ताजी बातमी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर जिल्ह्याचे एसपी यांच्यासह पत्रकार परिषदेला संबोधित केले. जिल्ह्यात सध्या २५ रुग्ण आहेत. ५४ जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज केले आहे. होम क्वॉरनटाईनचे काटेकोरपणे पालन करावे. 

कोरोनामुळे जेवणाचे हाल होत असलेल्या गरिबांसाठी पाच रुपयांत शिवभोजन थाळी मिळणार आहे. जिल्ह्यात त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्यातील शाळांमध्ये काही मजूरांना ठेवण्यात येईल. त्यांच्या जेवण्याच्या व्यवस्थेसाठी सेवाभावी संस्थांना पुढे येण्याचे आवाहन आम्ही केले आहे. खाजगी डॉक्टरांनी आपला दवाखाना सुरू ठेवावा. त्यामुळे इतर आजर असणाऱ्या लोकांची गैरसोय होणार नाही. जिल्ह्यातील नागरिकांना स्वस्त धान्य दिले जाईल. मला खात्री आहे की आपल्या जिल्ह्यातील यंत्रणा कोरोना वाढू देणार नाही. घरातून बाहेर न पडणे हाच एकमेव ठोस उपाय आहे हे नागरिकांनी जाणून वागावे.

शेतकऱ्यांच्या नाशवंत मालाचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही वाहनांना परवाने देत आहोत. मात्र या परिस्थितीचा गैरफायदा कोणी घेऊ नये. गैरफायदा घेत असल्याचे आढळल्यास प्रशासन त्यावर कडक कारवाई करणार.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात