कोरोनाचा प्रसार बीड जिल्ह्यात होऊ नये यासाठी वैयक्तिक काळजी घेऊ
आज दुपारी शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात व आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्या सोबत जिल्हा रुग्णालयात जाऊन स्थापन केलेल्या विभागाची पाहणी केली.
आपल्या भागात कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी आपण सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. नगरपालिका, नगरपरिषद, शाळा, महाविद्यालये, एकत्रित येण्याच्या सर्वच गर्दीच्या ठिकाणी आपण जाणे टाळायला हवे. बाहेर जाणे टाळा, घरात राहून काम केले तर चांगलेच. लहान मुलांची, घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या.
बीड शहर आणि आसपासच्या परिसरात अनेक लोक येत असतात म्हणून प्रशासनाने काही कठोर निर्णय घेतले आहेत. माझी बीडकरांना विनंती आहे की, त्यांनी मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे. हे अस्मानी संकट आहे. आपल्या जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव होऊ नये याची आपण सर्वच काळजी घेऊ.
आमदार संदीप क्षीरसागर