कुक्कुटपालन व्यवसायाच्या समस्यांसंदर्भात शिष्टमंडळाने घेतली मंत्री सुनिल केदार यांची भेट
राज्यातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाच्या विविध विभागांकडून सहकार्य करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
मंत्रालयात कुक्कुटपालनासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी पोल्ट्री फार्मर्स व ब्रिडर असोसिएशन यांच्या शिष्टमंडळाने पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार सुनिल तटकरे, आमदार रोहित पवार, पोल्ट्री फार्मर्स व ब्रिडर असोसिएशनचे पदाधिकारी सी.वसंतकुमार, श्रीकृष्ण गांगुर्डे, उद्धव अहिरे, डॉ.प्रसन्न पेडगांवकर यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.