ताजी बातमी

पश्चिम रेल्वेवर सगळ्यात स्वच्छ रेल्वे स्थानक होण्याचा मान अंधेरी रेल्वे स्थानकाला मिळाला आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे चक्क रेल्वेच्या दुसऱ्या टोकाला असलेलं विरार स्थानक. अंधेरी आणि विरारसह अन्य सहा उपनगरी रेल्वे स्थानकांना टॉप १० स्वच्छ स्थानकांमध्ये स्थान मिळाले आहे. रेल्वे मंत्रालयाने हे वार्षिक सर्वेक्षण केले आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच या सर्वेक्षणात उपनगरीय रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यातटॉप १० मध्ये मध्य रेल्वेची तीन स्थानके आहेत. त्यात डोंबिवलीचा समावेश आहे. 'स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९' सर्वेक्षण अलीकडेच करण्यात आलं. यात देशभरातील एकूण ७२० रेल्वे स्थानकांमधील स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. उपनगरीय नसलेल्या स्थानकांमधील टॉप १० यादीत राजस्थानमधील सात रेल्वे स्थानके आहेत. यात जयपूरमधल्या तीन स्थानकांचा समावेश आहे.

या सर्वेक्षणासाठी २५० जणांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यापैकी प्रत्येक स्थानकावर दोन सर्वेक्षकांनी भेट दिली. पाहणी करण्यात आलेल्या ७२० रेल्वेस्थानकांपैकी १०९ उपनगरी स्थानके होती. या सर्वेक्षकांनी सलग दोन दिवस स्थानकांचं निरीक्षण केलं. कोलकाता मेट्रो ते चेन्नई स्थानकापर्यंत अनेक उपनगरी स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले मात्र मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर स्थानकांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला नव्हता. कारण या दोन्ही स्थानकांवरून लांब पल्ल्याच्या गाड्याही सुटतात.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात