ताजी बातमी

रस्त्याकडेला असलेल्या टपरीवर चहा पिणाऱ्यांना भरधाव टेम्पोने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटे बोरिवलीच्या गणपत पाटील नगरमध्ये घडला. रायसाहेब यादव (४५) असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी एम. एच. बी कॉलनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपत पाटील नगरातील गल्ली क्रमांक तीनमध्ये असलेल्या चहाच्या टपरीवर रविवारी पहाटे काहीजण चहा पित होते. यामध्ये बहुतांश रिक्षाचालक होते. पहाटे साडेचारच्या सुमारास एक टेम्पो या ठिकाणी आला. वेगात असल्याने टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटले आणि हा टेम्पो चहा पिणाऱ्या पाच जणांवर जाऊन धडकला. या अपघातामध्ये जखमी झालेल्या सर्वांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर दुखापत झाल्याने रायसाहेब याचा मृत्यू झाला तर इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातानंतर टेम्पोचालक घटनस्थळावरून पसार झाला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात