ताजी बातमी

भायखळा येथील तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश पोळ (२९) असे मृत तरुणाचे नाव असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली. याप्रकरणी भायखळा येथून चौघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

वडाळा बीपीटी मार्गावरील गोदरेज जंक्शन येथे एक तरुण बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती मंगळवारी सकाळी वडाळा पोलिसांना मिळाली. या तरुणाला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पाकिटामध्ये सापडलेल्या आधार कार्डवरून या तरुणाचे नाव गणेश पोळ असल्याचे स्प्ष्ट झाले. पोलिसांनी याबाबत वायरलेस मेसेज जारी केला असता भायखळा पोलिस ठाण्यात गणेश पोळ याचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. दोन गटांतील वादातून ही हत्या झाल्याचे समजले. सुशांत साळुंखे याच्यासोबत गणेश पोळचे काही कारणास्तव भांडण झाले होते. त्याने अलोक, रुपेश आणि किसन या मित्रांच्या मदतीने गणेशला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह वडाळा येथे फेकून देण्यात आला. या हत्येमागील नेमक्या कारणाबाबत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात