ताजी बातमी

ॅन्टॉप हिलच्या विजयनगर परिसरात बुधवारी मध्यरात्री २५ वाहने जळून खाक झाली. रहिवाशांनी वेळीच धावपळ करून आग विझवल्याने अन्य वाहने सुरक्षित राहिली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी, रहिवाशांनी यात घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

विजयनगर येथील गणेश मंदिरासमोरील मोकळ्या जागेत दररोज रात्री रहिवासी शंभर ते दीडशे वाहने उभी करतात. यात दुचाकींसह चारचाकी आणि मालवाहू टेम्पोंचाही समावेश असतो. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास परिसरातील महिंद्र मुंजे हा कामावरून घरी परतत असताना ओळीने उभ्या केलेल्या या वाहनांनी पेट घेतल्याचे त्याने पाहिले. त्याने रहिवाशांना सूचना दिल्यानंतर तातडीने ही आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत २५ वाहने भस्मसात झाली होती. त्यात २३ दुचाकी, एक टेम्पो एका कारचा समावेश आहे.

याआधी मुंबईसह राज्याच्या अन्य शहरांमध्ये पार्क केलेली वाहने जाळण्याचे प्रकार घडले आहेत. विजयनगर येथील आगही लावण्यात आली असावी, असा संशय रहिवासी व्यक्त करतात. वडाळा टीटी पोलसांनी घटनेची नोंद घेत चौकशी सुरू केली आहे. प्रत्यक्षदर्शीच्या जबाबांसह सीसीटीव्ही चित्रण पडताळणी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांनी सांगितले.

 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात