ताजी बातमी

गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कॅम्प पवई येथील अंबिकासागर या इमारतीतीतील पाचव्या मजल्याचा स्लॅब भल्या पहाटे झोपेत असलेल्या चौथ्या मजल्यावरील सातपुते यांच्या कुटुंबावर कोसळला. या दुर्घटनेत मलब्याखाली दबून नीरज सातपुते या अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून घरातील दोघे जखमी झाले आहेत. त्यामुळे उल्हासनगरमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

उल्हासनगर कॅम्प नंबर तीन पवई परिसरात अंबिकासागर ही इमारत आहे. या पाच मजली इमारतीमध्ये २५ सदनिका आणि पाच दुकाने आहेत. इमारतीच्या स्लॅबला गेल्या काही काळापासून गळती लागल्याने वरील भागात पत्र्यांचे शेड टाकण्यात आले होते. हे शेड काही ठिकाणी नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी इमारतीच्या टेरेसवर जमले होते. ते पाचव्या मजल्यावर गळत असल्याने ५०१ सदनिकेचे मालक रमेशचंद नागदेव हे दुसरीकडे स्थलांतरित झाले. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ४०१ या सदनिकेत तात्याराव सातपुते यांचे कुटुंब राहते. त्यांच्या बेडरूमच्या स्लॅब हा कमकुवत झालेला असतानाही शनिवारी रात्री सातपुतेंची पत्नी पंचशीला आणि त्यांचा नातू नीरज हे झोपले. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास ५०१ या सदनिकेचा स्लॅब अचानक कोसळला. या दुर्घटनेत मलब्याखाली दबून नीरज सातपुते या अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशामल दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नीरज आणि त्याच्या आजीला मलब्यातून काढून मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. तिथे नीरजला मृत घोषित करण्यात आले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात