तरुणीच्या हत्येनंतर तरुणाची आत्महत्या
तरुणीला मारहाण करून तिचा गळा दाबून हत्या करत तरुणाने स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील नीलम गेस्ट हाऊसमध्ये घडली आहे. प्रतिमा प्रसाद असे या तरुणीचे नाव असून ती घाटकोपर येथे राहत होती. तर अरुणकुमार गुप्ता असे तरुणाचे नाव असून उत्तर प्रदेशच्या आझमगड येथे राहत होता. नीलम गेस्ट हाऊसमध्ये शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वेटरने त्यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी प्रतिमा मृतअवस्थेत तर अरुणकुमार गुप्ता याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.