ताजी बातमी

मंत्रालयातील एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याचा सोशल मीडियावर छळ करणाऱ्या तरुणाला सायबर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. शरीफ गफार खान असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला पुणे मंत्रालयात एका उच्च पदावर काम करणाऱ्या करणाऱ्या महिलेच्या सोशल मीडियावरील प्रोफाइलवर गेल्या काही दिवसांपासून एक व्यक्ती पाठलाग करत होता. अनेकदा या व्यक्तीने या महिला अधिकाऱ्याचा विनयभंगही केला. याबाबत या महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यावर तपास सुरू झाला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सायबर पोलिसांनी शरीफ याला पुण्यावरून ताब्यात घेतले. मंगळवारी त्याला मुंबई येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात