ताजी बातमी


उत्तर मध्य आणि उत्तर पूर्व राज्यांमध्ये  थीफ नावाने प्रसिद्ध असलेल्या या टोळीचा म्होरक्या अशाच एका गुन्ह्यात सध्या बिहारच्या जेलमध्ये असून, तेथे बसून त्याने उंटवाडीरोडवरील मुथूट फायनान्सवरील दरोड्याची सर्व सूत्रे हलविल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे. सुबोध सिंह, असे या कुख्यात आरोपीचे नाव आहे. आजवर त्याने ओडिशा, राजस्थान, झारखंड, पश्चिम बंगाल अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या साथीदारांसमवेत मुथूट कार्यालयांमधून कोट्यवधी रुपयांची लूट केली आहे. संबलपूर येथील दरोड्याप्रकरणी २० जानेवारी २०१८ मध्ये सुबोध सिंगला अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०१७मध्ये राजस्थानमधील जयपूर येथील मुथूट कार्यालयातील ३१ कोटींच्या दरोड्याप्रकरणात सुबोधसह त्याच्या साथीदारांचा सहभाग समोर आला होता. गत वर्षी उघडकीस आलेल्या या गुन्ह्यांमध्ये सध्या सुबोध बिहारमधील एका जेलमध्ये बंद आहे. मात्र, तेथून त्याचे उद्योग सुरूच असल्याचे शहरातील मुथूट कार्यालयातील दरोड्याच्या प्रकरणानंतर समोर आले आहे

सुबोध सिंह हा सराईत गुन्हेगार असून, काही मर्जीतील, काही स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून तो दरोड्याची तयारी करतो. नाशिकमधील दरोड्यावेळी हजर असलेले उमेश तिवारी, माझी आणि पप्पू हे सुबोधचे पंटर होते. जितेंद्रसिंग आणि आकाशसिंग राजपूत हे सुरत येथील गुन्हेगार परमेंदर सिंगच्या संपर्कात आले होते. यासाठी मनीष राय ही व्यक्ती महत्त्वाचा दुवा ठरली होती. अनुप साहूच्या बहिणीचे नाशिक हे सासर आहे, तर सुभाष गौड हा दोन वर्षांपासून नाशिकमध्ये राहत असल्याने त्यांची निवड करण्यात आली. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना एका घरात आसरा मिळण्याचे दरोड्याचे प्लॅनिंग करण्याच्या सुविधा सहज मिळाल्या. शहर पोलिसांनी अटक केलेल्या परमेंदरच्या म्हणण्यानुसार १२ ते १४ जून यादरम्यान उमेश तिवारी आणि माझी हे दोन पंटर सतत सुबोध सिंगच्या संपर्कात होते. जेलमध्ये बंद असलेल्या सुबोधकडून फोनवर मिळणाऱ्या सूचनांचे हे दोघे पालन करीत होते, असे परमेंदरने पोलिसांना सांगितले. या टोळीने मध्य प्रदेश राजस्थानसोडून यावेळी थेट उत्तर महाराष्ट्राला लक्ष्य केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात