ताजी बातमी

राजस्थानच्या बर्मेर जिह्यात एक धार्मिक कार्यक्रम सुरू असताना आलेल्या जोराच्या वाऱयामुळे मंडप पत्त्याप्रमाणे कोसळला. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू तर 50 जण जखमी झाले, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ‘रामकथाहा कार्यक्रम सुरू असताना ही दुर्घटना घडली. मंडपाखाली अडकल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती बालोताराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रतनलाल भार्गव यांनी दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कार्यक्रमात 100 भाविकांनी सहभाग घेतला होता.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. जखमी भाविक लवकरात लवकर बरे होऊन घरे जावोत अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आपण मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखात सहभागी असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात