ताजी बातमी

पुनर्विकास प्रकल्प अजून रखडला असल्याने धारावीतील अनेकविध संस्थांनी आक्रमक रूप धारण केले आहे. धारावीतील रहिवाशांचे सर्वेक्षण करून त्याची यादी परिशिष्ट-दोन तयार करून राज्य सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाविषयी रविवारी पार पडलेल्या सभेत रहिवाशांनी एकत्र येत पुनर्विकास साकारण्यासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प सुमारे १५ वर्षांपासून रखडला आहे. नव्या योजना, घोषणा होताना प्रत्यक्षात काहीही साध्य होत नसल्याची स्थानिकांची खंत आहे. राज्य सरकारकडून फक्त निविदा प्रक्रियेचे काम सुरू असल्याचा धारावीवासीयांचा आक्षेप आहे. राज्य सरकारने धारावीतील समस्यांवर तातडीने लक्ष वेधण्यासाठी रविवारी सायन वांद्रे लिंक मार्गावरील सभागृहात सभा घेण्यात आली. त्यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा त्यात सहभाग होता. या सभेत प्रकल्पाबाबत चर्चा होऊन आंदोलन उभाण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रहिवाशांबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेतली जाणार आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात