ताजी बातमी

मुंबईतील समुद्रात दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मरिन ड्राईव्हच्या समुद्रात ११ वर्षीय भैरव बारिया याचा तर जुहू चौपाटीत बुडून ४० वर्षाच्या इसमाचा मृत्यू झाला आहे. 

दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भैरव बारिया याचा मरिन ड्राईव्हवर तर दुपारी साडे तीन वाजता जुहू चौपाटीवर एक जण बुडाल्याच्या घटना घडल्या. जुहू चौपाटीवर बुडालेल्या ४० वर्षीय व्यक्तीला बाहेर काढून कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सध्या सुट्ट्या असल्याने मुंबईतील समुद्रावर, चौपाट्यांवर फिरण्यासाठी मोठी गर्दी होत असते. समुद्रात खेळण्यासाठी अनेक जण पाण्यात उतरत असतात. अशावेळी बुडण्याच्या अनेक घटना समोर येतात. त्यामुळे भान ठेऊन मौज करण्याचा तसेच आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात