ताजी बातमी

सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील निर्बंध शिथिल करून सहा महिने उलटले तरी डान्सबारचा परवाना घेण्यासाठी बारमालक फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत केवळ सहाच अर्ज परवानगीसाठी पोलिसांकडे आले आहेत. डान्सबारवर पूर्णत: बंदीसाठी सरकार आणणार असलेल्या अध्यादेशाची धास्ती आणि न्यायालयाने रात्री साडेअकरापर्यंतची दिलेली परवानगी यामुळे 'ऑक्रेस्ट्रा बारच बरे', असा सध्या बारमालकांचा पवित्रा आहे.

जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत डान्सबार सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली. या आदेशामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सीसीटीव्ही, संरक्षक भिंत, सुरक्षित अंतर, मद्यसेवनास मनाई हे महत्त्वाचे निर्बंध शिथिल केले. मात्र, ही परवानगी देताना रात्री साडेअकरा वाजता बार बंद करण्याची मर्यादा घातली. रात्रीची वेळ व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची असून उशिरापर्यंत बार सुरू दिसल्यास पोलिस कारवाई निश्चित आहे. पैसे उडवता येणार नाहीत, त्याबदल्यात टीप देता येईल. त्यामुळे त्याचाही हिशेब ठेवावा लागेल. यामुळे फायद्यापेक्षा नुकसानच अधिक असल्याने बारमालक डान्सबार सुरू करण्यास फारसे उत्सुक नाहीत. पाच ते सहा बारमालकांनी डान्सबारसाठी अर्ज केले असून स्थानिक पोलिसांच्या अहवालानंतर त्यांना परवानगी दिली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात