ताजी बातमी

मरिन ड्राइव्हवर मफतलाल स्विमिंग पूलसमोर पोलिसांना शुक्रवारी दोन मृतदेह आढळले. वैद्यकीय तपासणीमध्ये या दोघांचा मृत्यू कीटकनाशक प्यायल्याने झाल्याचे उघड झाले आहे. हे दोघे पती-पत्नी असल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मफतलाल स्विमिंगपूल समोरच्या पदपथावर एक महिला आणि एक पुरुष निपचित पडले असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. मरिन ड्राइव्ह पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांना जीटी रुग्णालयात नेले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. वैद्यकीय अहवालात कीटकनाशकाचे सेवन केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. महिलेचे वय अंदाजे ३५ तर पुरुषाचे वय ४५ ते ५० वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांकडे केवळ काही पैसे मिळाले, मात्र ओळख पटविण्यासारखे काहीच सापडले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार कुठे केली आहे का? याची माहिती पोलिस घेत आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात