ताजी बातमी

नरोडा येथील कुबेर नगर वॉर्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या नीतू तेजवानी या स्थानिक समस्येवरून बलराम थवानी यांना जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र संतापलेले आमदार आणि त्यांच्या समर्थकांनी या महिलेल्या जोरदार चापट लगावली. त्यामुळे नीतू खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. नीतू यांनी आमदाराने केलेल्या मारहाणी विरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रथम पोलिसांनी नकार दिला होता. मात्र या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली, असे नीतू यांनी सांगितले आहे. आपल्या सोबत पतीला देखील मारहाण करण्यात आल्याचे तिने सांगितले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात