ताजी बातमी

पुणे-बंगळुरू महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात औरंगाबादचे सात जण जागीच ठार झालेत. बेळगावमधील श्रीनगर येथील महामार्गावर दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. कारचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याने कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी वेळ लागला. तसेच या अपघातात ट्रकची समोरील बाजू चेपली गेली आहे. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यानआज सकाळी कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शन घेतल्यानंतर कारमधील सर्व जण हे गोव्यात फिरण्यासाठी जात होते. मात्र, काळाने त्यांचावर झडप घातली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात