ताजी बातमी

सायन-धारावी परिसरातील वाहतूककोंडी कमी करून प्रवासाच्या अंतरात किमान तीन किलोमीटरची तसेच प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत करणाऱ्या वांद्रे कुर्ला संकुल ते पूर्व द्रुतगती मार्गावर उन्नत मार्ग उभारण्यातील एक महत्त्वाची कामगिरी एमएमआरडीएने फत्ते केली. याअंतर्गत सलग तीन दिवसांत भल्या पहाटे सहा गर्डर टाकण्यात आले. या उन्नत मार्गासाठी सायन रेल्वे ओलांडणारा पूल आणि चुनाभट्टी रेल्वे उड्डाणुपलावरून हे गर्डर टाकण्यात आले.

या गर्डरपैकी सायन रेल्वे पुलावर ५२ मीटर लांबीचे ४८० टन वजनाचे तर, चुनाभट्टी रेल्वे पुलावर ६० मीटर लांबीचे ६०० टन वजनाचे गर्डर टाकण्यात आले. त्यामुळे मिठी नदीवरील पूल, मध्य रेल्वे मार्गावर सायन स्थानकाजवळील रेल्वे ओलांडणारा पूल तसेच हार्बर मार्गावर चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ओलांडणारा पूल बांधण्यास मदत होणार आहे. हा उन्नत मार्ग लवकरात लवकर बांधण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात