ताजी बातमी

लिंब, ता. सातारा परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवा शेतकर्यांनी आत्महत्या केली. या दोन्ही घटनांनी परिसरात खळबळ उडाली आहे. लिंब येथील सुनील लक्ष्मण सोनमळे (वय 40) हे कर्जबाजारी झाल्याने तसेच शेतातील नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडले होते. त्या नैराश्येतूनच त्यांनी राहत्या घरी तुळईला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

दुसर्या घटनेत वनगळ (ता. सातारा) येथील किरण रामचंद्र साळुंखे (वय 28) यांनी मळा नावाच्या शिवारातील आपल्या शेतात विषारी औषध प्यायले. याबाबतची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई-वडील बहिणी असा परिवार आहेलिंब परिसरात दोन युवा शेतकर्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने  हळहळ व्यक्त होत आहे. या घटनांची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून हवालदार  सावंत अधिक तपास करीत आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात