ताजी बातमी

लोकलवर चार वेळा दगड भिरकावल्याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी विक्रोळीतील एका ५५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. कृष्णा शेलेती असे या व्यक्तीचे नाव असून रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आपण लोकलवर दगड फेकत असल्याचे शेलेती यांनी पोलिसांना सांगितले. यातून प्रवाशांना इजा पोहोचवण्याचा आपला कोणताही इरादा नसल्याचे शेलेती यांनी पोलिसांना सांगितले. रेल्वे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे

विक्रोळी ते कांजुरमार्गदरम्यान प्रवास करत असताना गेल्या महिन्यात दगडफेकीमुळे प्रवासी जखमी झाले होते. त्यानंतर या परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली. काही दिवसांपूर्वी विक्रोळीत रेल्वे रुळांच्या आसपास एक व्यक्ती हातात दगड घेऊन उभी असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्या व्यक्तीला तत्काळ अटक केली. या व्यक्तीचे नाव कृष्णा शेलेती हे असून ती टागोर नगरची रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात