पुणे: मुळशी धरणात तिघांचा बुडून मृत्यू
मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेले तीन जण आज सकाळी धरणात बुडल्याची प्राथमिक माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. यापैकी दोन मुली आणि एक मुलगा आहे. हे सर्व भारती विद्यापीठचे विद्यार्थी आहेत. दरम्यान, एका मुलीचा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.
ही मुलं त्यांच्या ग्रुपसह येथील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामी आल्या असल्याचे समजते. सकाळी हे सर्व धरणाच्या पाण्यात पोहण्यास उतरले असताना ही घटना घडली आहे. आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे.
About The Reporter
The News Reporter works under the supervision of the News Director. The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for radio newscasts, produces in-depth radio features, and produces special reports as assigned.