मसूद अझर जागतिक दहशतवादी
पाकिस्तानातील जैश-ए-महम्मद
या
दहशतवादी
संघटनेचा
प्रमुख
मसूद
अझरला
अखेर
संयुक्त
राष्ट्रांनी
बुधवारी
जागतिक
दहशतवादी
म्हणून
घोषित
केले.
याबाबतच्या
प्रस्तावावरील हरकत चीनने मागे
घेतल्यानंतर
ही
घोषणा
करण्यात
आली
असून,
भारताच्या
मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय
असल्याचे
मानले
जाते.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नकाराधिकार असलेला कायम सदस्य चीन हा अझरला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रयत्नांत एकमेव अडथळा होता. या प्रस्तावावर ‘तांत्रिक हरकत’ घेत आणि या प्रस्तावाचा ‘अभ्यास करण्यासाठी आणखी वेळ’ मागून घेत चीनने या प्रयत्नांमध्ये खोडा घालणे सुरू ठेवले होते. ‘मसूद अझरचा संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंध यादीत समावेश करण्यात आला आहे. सर्वानी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांच्याबाबत कृतज्ञ आहोत,’ असे ट्वीट भारताचे राजदूत आणि संयुक्त राष्ट्रसंघातील कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी केले.
चीनने हरकत मागे घेतली आहे काय, असे विचारले असता अकबरुद्दीन यांनी होकारार्थी उत्तर दिले. र्निबध समिती सर्व सदस्यांच्या सहमतीने निर्णय घेत असते. चीन या मुद्दय़ावर सकारात्मक भूमिका घेऊन अझरबाबतच्या प्रस्तावावरील हरकत मागे घेईल, असे संकेत अलीकडच्या दिवसांत मिळाले होते. संयुक्त राष्ट्रांमार्फत अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा गुंतागुंतीचा मुद्दा ‘योग्य प्रकारे सोडवला जाईल,’ असे चीनने मंगळवारी म्हटले होते.