मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद
मुंबईतील महत्त्वाचा सायन उड्डाणपूल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
वाशी, नवी मुंबई आणि पुढे पुण्याला जाण्यासाठी सायन उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. २००३ सालापासून वाहतुकीसाठी सुरू झालेल्या या उड्डाणपुलाचे काही महिन्यांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार, उड्डाणपुलाचे बेअरिंग तातडीने बदलण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ही गरज लक्षात घेत, एमएसआरडीसीने वाहतूक विभागाशी चर्चा करून मेपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.