ताजी बातमी

माथेरानकडून नेरळ स्थानकाकडे पर्यटकांना नेणारी माथेरानची राणी बुधवारी सकाळी 11.30 वाजता पुन्हा एकदा रुळावरून घसरली आहे. त्यामुळे पर्यटकांचा खोळंबा झाला आहे. या दुर्घटनेत सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मात्र, माथेरानच्या राणीने प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी माथेरान स्थानकातून निघालेली माथेरानाची राणी जुम्मापट्टी स्थानकादरम्यान सुमारे 11 वाडून 30 मिनीटांनी वळणाच्या ठिकाणी घसरली. वळणावर गाडीचे इंजिन रुळावरून खाली घसरले. राणीला रुळावर आणण्यासाठी वेळ लागत असल्याने प्रवाशांनी पाच किलोमीटरचा प्रवास पायपीट करत जंगलातूनच पार केला. मुख्य रसत्यावर येताच पर्यटकांनी मिळेल त्या वाहनांनी मार्गक्रमण केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात