ताजी बातमी

नाशिकचांदोरा येथे हरणांची शिकार करताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास दोघे जण शिकार करण्यात मग्न होते. यावेळी सर्तक नागरिकांनी पोलीस आणि वनअधिकाऱ्यांना याची माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य आणि दुचाकी, मोबाईलही जप्त करण्यात आले आहे.

नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हरण आणि कळविटांची संख्या आहे. चांदोरा शिवारातही हरणांचे अनेक कळप आहेत. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास हत्यारांसह काही लोक प्राण्याची शिकार करीत असल्याची माहिती ग्रामस्थांनी नाशिक नियंत्रण कक्षाला दिली

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात