ताजी बातमी

दापोली तालुक्यातील अडखळ झुंजारवाडी येथे मनाली महेंद्र खामकर या ३८ वर्षीय विवाहित महिलेचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

मनालीचा पती महेंद्र पांडुरंग खामकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी संशयित म्हणून रुपेश महादेव खामकर (वय- ४० वष्रे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, मोलमजुरी करून संसार चालवणारे खामकर दाम्पत्य शनिवारी रात्री घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीत आपल्या दोन मुलांसहित झोपले होते. मात्र मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास संशयित नराधमाने धारदार शस्त्राने कोणाला काही कळण्याच्या आतच मनालीच्या मानेवर वार केले. त्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू ओढावला.

मनालीचा पती महेंद्र खामकर यांनी दिलेल्या फिर्यादीत गेली सुमारे दोन वष्रे चालू असलेल्या प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आणि त्याबद्दल रुपेश खामकर याचे नाव संशयित म्हणून पोलिसांकडे दिले आहे. यावरून संशयित आरोपीला दापोली पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेतले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात