ताजी बातमी

मुलीने इच्छेविरुद्ध आंतरजातीय विवाह केल्याने आई-वडिलांनीच मुलीचा खून केल्याची घटना नेवासे तालुक्यातील कौठा या गावी उघडकीस आली. प्रतिभा कोठावले (२४) असे या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.

काही दिवसांपूर्वी संगमनेर येथील देवेंद्र कोठावले या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची प्रतिभाशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. त्यांचे काही दिवसांपूर्वी लग्नही झाले होते. मुलगा परजातीचा असल्याने मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी प्रतिभाशी संपर्क साधून कौठा या गावी बोलावून घेतले. तिचा खून करून मृतदेह जाळून टाकला. पती देवेंद्र यांनी प्रतिभाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाल्याने त्यांनी कौठा गाव गाठले. मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे आई-वडिलांनी त्यांना सांगितले.

पत्नीचे असे अचानक निधन झाल्याचे ऐकून पती देवेंद्र यास संशय आला. त्यांनी सोनई पोलिसांत याबाबत तक्रार केली. पत्नीच्या माहेरच्यांनी तिला मारल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात मुलीचे वडील ब्रह्मदेव रमाजी मरकड आई आशा ब्रह्मदेव मरकड (कौठा, ता. नेवासे) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात