स्पाईस जेटचे 180 प्रवासी 12 तासांपासून विमानतच अडकून
स्पाईस जेटच्या विमानानं दुबईला निघालेले तब्बल 180 प्रवासी मागील
12 तासांपासून विमानातच अडकून आहेत.
तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांचे विमान विमानतळावरून उड्डानच करू शकले नाही.
यामुळे प्रवासी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये घबराहट पसरली आहे.
स्पाईस जेटचे हे विमान रविवारी रात्री ८ वाजता लोहगाव विमानतळावरून उड्डान करणार होते.
मात्र प्रवाशी विमानात बसल्यानंतर त्यांना विमान उड्डाण करू शकणार नसल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
आता निघेल, नंतर निघेल करत प्रवाशांना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ताटकळत ठेवण्यात आले.
आता काही वेळापूर्वी त्यांना विमानतून बाहेर काढण्यात आले.
प्रवाशांमध्ये अनेक महिला,
लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत.
संपूर्ण रात्र विमानात काढावी लागल्यानं त्यांचे खूप हाल झाले.
विमानात तसेच विमानतळावर पुरेशा सुविधा नसल्याने त्यांचा संताप अनावर झाला आहे.