*यशस्वी सापळा कारवाई*
वाशिम
*तक्रारदार :- पुरुष,वय 29 वर्षे.व्यवसाय शेती
- संदिप समाधान मोरे,वय 33 वर्ष,
पद- तांत्रिक अधिकारी, जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय,वाशिम.
*लाच मागणी रक्कम* :- 8000/- ( आठ हजार रुपये)
पडताळणी :-
दि.24/04/2019 सापळा कारवाई :-
दि.26/04/2019,
स्वीकारली रक्कम :-5000/- रुपये.(पहिला टप्पा)
तक्रारदार यांनी व त्यांचे गावातील इतर तीन शेतक-यांनी त्यांचे शेतामध्ये जिल्हा रेशिम कार्यालया मार्फत मनरेगा अंतर्गत तुती लागवड केलेली आहे. याेजनेअंतर्गत तुती लागवड,शेड बांधण्याकरीता व मजूरीसाठी शासनाकडून तीन लाख रूपये पर्यंत अनुदान मिळते, त्याकरीता तक्रारदार व इतर तीन शेतक-यांनी शेड पूर्ण बांधून शेडचे बील संपूर्ण कागदपत्रासह कार्यालयात सादर केले असता आरोपी इलोसे संदिप मोरे यांनी तक्रारदारासह इतर तीन जणांचे बिल काढण्याकरीता फाईल पुढे पाठविण्यासाठी प्रत्येकी दोन - दोन हजार असे 8000/- रूपयाचेे लाचेची मागणी केली व सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष जिल्हा रेशिम कार्यालय,वाशिम येथे पहिला हप्ता 5000/- रुपये लाच स्वीकारली आहे.
मा.श्री. श्रीकांत धिवरे सर, पोलीस अधिक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परीक्षेत्र अमरावती.
मा. श्री पंजाबराव डोंगरदीवे अपर पोलिस अधिक्षक, अमरावती परिक्षेत्र अमरावती
मा. श्रीे. राहुल गांगुर्डे,पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,वाशिम.
*कारवाई पथक* पोलिस निरीक्षक निवृत्ती बो-हाडे,
पोहेकॉ.नितीन टवलारकर,दिलीप बेलोकार, नापोशी सुनिल मुंदे,विनोद अवगळे , ला.प्र.वि. वाशिम व शासकिय पंच.
हँश व्हँल्यू घेण्यात आली असून गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू आहे.
आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,वाशिम,आंबेडकर चौक, वाशिम.
*@ दुरध्वनी क्रं. 07252-235933*
*टोल फ्रि क्रं. 1064*