ताजी बातमी

रबाळे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 231/19 IPC 363 मधील अपहरित बालक कु. यश रवींद्र शेलार वय  साडेतीन वर्षे यास आरोपीत हेमंत सुभाष मोरे वय 32 वर्षे यांने दि 18/04/2019 रोजी 20:00 वा चे सुमारास पळून नेले होते.

त्यामुळे त्याचे आई वडील हे खुप तनवाखाली होते गुन्हा दाखल ज़ाल्यानंतर तात्काळ मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षकसो श्री मोहिते सरांच्या मार्गदर्शनखाली वेगवेगळी तपास पथके तैयार करुण .. आरोपित नामे हेमंत मोरे याचे राहते पत्त्यावर गोवंडी ,मानखुर्द ,या ठिकाणी  पाठवली असता कोणतीही उपयुक्त माहिती भेटत नव्हती .. तसेच त्यात अरोपिचा मोबाइल बंद असल्या कारणाने त्याचे लोकेशन किंवा इतर माहिती  भेटत नव्हती ...

त्याचा शोध  रबाळे पोलीस ठाण्याचे  मा. वपोनी श्री मोहिते ,पोनि श्री गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली psi पोवार,पो. हवा. मगर व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे चे  पो. उप. निरीक्षक धनवडे , पो. ह. सोनावणे ,पो. शि.मोकळे, पो. शि. करड़े ,पो.ना.वारींगे ,हे करीत होते.

आज दि.20/04/2019 रोजी  पो. उप. निरिक्षक धनवडे,पो. शि. मोकळे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार .. आरोपित  मुलाला घेवून  APMC मार्केट वाशी  या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशिर माहिती भेटल्याने सदरची माहिती व.पो.नि  सो यांना देवून .. APMC मार्केट वाशी या ठिकाणी  सापळ रचून अरोपिस शिताफिने  ताब्यात घेतले व अपहरत  मुलास सुरक्षित त्याच्या आई वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

सदर कामगिरी बद्दल सर्व पथकाचे हार्दिक अभिनदंन

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात