ताजी बातमी

विद्याविहार ते कोपर स्थानकादरम्यान प्रवास करताना 1 लाख 36 हजार रुपयांची गहाळ झालेली बॅग डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या तासाभरात परत केली. ही उत्तम कामगिरी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार (बक्कल नं. 1857) जावळे, पोलीस नाईक (बक्कल नं. 890) ढाणे, महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला गायकवाड यांनी केली.

      विद्याविहार परिसरात राहणाऱ्या श्वेता प्रकाश राजे या दि. 17 एप्रिल 2019 रोजी दुपारी 12:45 च्या सुमारास कोपर येथे जाण्यासाठी टिटवाळा गाडीत बसल्या. लहान मुलाला घेऊन प्रवास करताना कोपर स्थानकात उतरल्या. मात्र गडबडीत बॅग गाडीतच विसरल्या. त्या बॅगेत 1 लाख 36 हजार रुपयांचे दागिने होते. बॅगेची आठवण येईपर्यंत लोकल सुसाट निघून गेली होती. श्वेता यांनी तात्काळ डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. 

      डोंबिवली लोगमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जावळे, पोलीस नाईक ढाणे, महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या गायकवाड यांनी बॅगेचा शोध सुरू केला. टिटवाळा स्थानकाच्या स्टेशन मास्तरांशी संपर्क साधण्यात आल्या. दरम्यान, सदर लोकल पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यास निघाली. लोकल डोंबिवली स्थानकात येताच महिला डब्यात विसरलेली बॅग ताब्यात घेतली. त्या बॅगेबाबात शहानिशा करून दागिन्यांसह बॅग महिला प्रवासी श्वेता राजे यांना परत करण्यात आली. 

     गहाळ झालेली बॅग परत मिळाल्याने श्वेता राजे यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात