ताजी बातमी

पालघर: उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र बहुजन विकास आघाडीचा पालघर लोकसभा उमेदवारच जाहीर झालेला नाही. पण महाआघाडीच्या बहुजन विकास आघाडीकडून पालघर लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. उमेदवार कोण याबाबत  मात्र अजूनही सस्पेन्स कायम आहे.

माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, माजी खासदार बळीराम जाधव, टीडीसीचे संचालक राजेश पाटील, बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांची नावे चर्चेत आहेत.

उमेदवारीबाबत मात्र बहुजन विकास आघाडीकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. बहुजन विकास आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत आहे. शक्तीप्रदर्शनात सिपीएम, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजेंद्र गावित हे भाजपमधून शिवसेनेत आले आहेत. शिवसेनेने या जागेवर हक्क सांगितल्याने, भाजपने ही जागा सेनेला सोडली. मात्र भाजपचे विद्यमान खासदार असलेले राजेंद्र गावित यांनाही भाजपने शिवसेनेत पाठवत, त्यांना उमेदवारी मिळवून दिली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात