ताजी बातमी

माझे बोट धरून पुढे आलो, असे कुणी म्हटले की मला भीती वाटते. एकदा मोदी बारामतीला आले असता म्हणाले होते, की मी पवार यांचे बोट धरून पुढे आलो आहे. माझे बोट धरताच मोदी खोटे बोलतात. मग, माझा हात धरला, तर ते काय करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे सध्या मोदी दिसले की मी लांबूनच त्यांना नमस्कार घालतो,' या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष        

शरद पवार यांनी मोदींवर टीका केली


हडपसर येथे शिरूर लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. या प्रसंगी आमदार दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब शिवरकर, जयदेव गायकवाड, 'राष्ट्रवादी'चे शहराध्यक्ष चेतन तुपे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, 'भारताची लोकशाही नागरिकांच्या जीवावर टिकून असल्याने तिला कुणीही हात लावू शकत नाही. आपली लोकशाही सक्षम आणि भक्कम आहे.' 

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात