ताजी बातमी

प्रतिनिधी

 नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या नूतन कार्यकारिणीची पहिली ऐतिहासिक बैठक मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय सभागृह येथे झाली,या बैठकीसाठी महाराष्ट्राच्या वीस जिल्ह्यातून कार्यकारिणीचे राज्य ,जिल्हा व तालुका पदाधिकारी ,आणि सभासद उपस्थित होते .
नॅशनल  युनिअन ऑफ जर्नलिस्टस् महाराष्ट्र (संलग्न -एनयुजे इं) ही पत्रकारांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे .प्रसार माध्यमांतील माध्यमकर्मीच्या हितासाठी पुढील सहा महिन्यांचे  उपक्रम आणि कार्य यांचे नियोजन    बैठकीत करण्यात आले. विशाल सावंत ,(संघटक सचिव )यांनी प्रास्ताविक केले व बैठकीचे प्रयोजन स्पष्ट केले ,सरचिटणीस सीमा भोईर यांनी नवीन  कार्यकारिणीच्या पदाधिकाराचे अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय धर्तीवर चा युनियन च्या कार्यक्रमाची माहिती दिली .
अध्यक्ष शीतल करदेकर यांनी मजिठिया वेतनहक्काबद्दल मार्गदर्शन केले  अधिस्वीकृती आणि वेतनवाढ , पत्रकार सर्वसुरक्षा या विषयांवरील युनियन ची भूमिका स्पष्ट केली.तसेच  जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
संघटन सचिव कैलास उदमले यांनी पनवेल येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय महिला संमेलनाचा आढावा घेऊन झालेल्या संमेलनाविषयी माहिती दिली.
अध्यक्ष शीतल करदेकर यांनी सर्व जिल्हा अध्यक्षांचे आभार मानताना राज्यात संघटना मजबुतीच्या दृष्टीने झालेल्या ऐतिहासिक सभासद नोंदणीबद्दल समाधान व्यक्त केले .बेळगाव चे अध्यक्ष श्रीकांत काकितकर यांनी कमी कालावधीमध्ये  १०० सभासद जोडल्याबद्दल सर्वानीअभिनंदन केले.
एनयुजेइंडियाचे आगामी राष्ट्रीय अधिवेशन चिंचवड येथे घेणार असल्याची सहमत पुणे जिल्हाध्यक्ष सचिन चपऴगावकर यांनी  व्यक्त केली.
बेऴगावात येथे 5,6सप्टेबर रोजी शाखेचा उद्धाटन सोहऴा व कार्यक्रम करणार असल्याचे बेऴगाव जिल्हाध्यक्ष काकतीकर व प्रवक्त्या निलिमा लोहार यांनी सांगितले. सातारा ,सांगलीं ,पुणे,जिह्यात गणपती आधीच कार्यक्रमाचे नियोजन होणार असल्याचेजिल्हा अध्यक्षानी तर
सचिव राजेंद्र जाधव यांनी उत्तर महाराष्ट्रात डिसेंबर मधे  आयोजित करण्यात येणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमाची माहिती दिली.तसेच पत्रकार व कुटुंबियांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी
धुळे जिल्ह्यातील वैद्यकिय अधिकार्‍यांशी चर्चा केल्याचे व त्याच धर्तीवर उत्तर महाराष्ट्रात काम करणार असल्याचे सांगितले.
 उर्वरित जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिह्यांत होणाऱ्या आगामी कार्याची माहिती दिली त्यामध्ये
राष्ट्रीय छायाचित्रस्पर्धा,महिला पत्रकार संमेलन, विमा योजना ,आरोग्य शिबीर, आदी विषयांचा समावेश करण्यात आला .
पत्रकारांच्या सर्व सुरक्षेसाठी गोल्ड ठरवा असा उपक्रम म्हणजे माध्यमकर्मीची अचूक नोंदणी करणे व केवऴ मूठभर पत्रकारांना मिऴणारे फायदे सर्वच श्रमिक माध्यमकर्मींना व्हावा यासाठी राज्यकार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य धर्मेद्र प्रताप सिंह यांनी प्रारूप तयार करणेस पुढाकार घेण्याची जबाबदारी देऊन ऱाज्य अध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे ठरले. यासाठी मागील अनेक महिनेपासून युनियन काम करत असल्याची माहिती  शीतल करदेकर यांनी दिली.
अधिस्विकृति समितीचे पुनर्गठन करणेसाठी सर्वोतोपरी काम करण्याचे बैठकीत ठरले.
काही बाद संघटनाना बाद करणे अत्यावश्यक असूनही काही सरकारी अधिकारी ठराविक संघटनांना खुश ठेवून  मनमानी करत असल्याने  राज्यातील पत्रकारांपर्यत चुकीचा संदेश पोहोचवण्याचे काम होत असल्याची नाराजी या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
खजिनदार वैशाली आहेर यांनी विविध उपक्रमाने उभा करण्यात येणारा निधी पत्रकारांच्या योजनेसाठीच खर्च करणार असल्याचे स्पष्ट केले .
आगामी राष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेसाठी नियोजन  स्वप्निल शिंदेच्या पुढाकारांने होणार असल्याचे ठरले.
ही बैठक यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जिह्याचे कार्यकारीणी पदाधिकारी व समन्वयक करत असलेल्या कामाबद्दल प्रवक्ते संदिप टक्के यांनी आभार मानले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात