ताजी बातमी


मोठ्या दुर्घटनेची घंटा वाजतेय का?

मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेला BKC लिंक रोड मार्गावरील Sion–Chunabhatti परिसरातील ब्रिज सध्या धोकादायक अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे.

ब्रिजच्या काही भागांना स्पष्ट तडे गेले असून, काँक्रीट सोलून पडण्याची चिन्हे दिसत आहेत. ब्रिज चढताना  वाहनचालकांना हादरे जाणवत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.

ही परिस्थिती केवळ बांधकामातील त्रुटींचे नव्हे, तर शासनाच्या दुर्लक्षाचे आणि ठेकेदाराच्या बेजबाबदार कामाचे द्योतक ठरत आहे. मुंबईसारख्या महानगरात दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर जर वेळेत दुरुस्ती झाली नाही, तर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थानिक नागरिक व प्रवासी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तात्काळ तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती व मजबुतीकरण (Structural Audit) करण्यात यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

 संबंधित विभागाने घटनास्थळी पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच जनतेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्वरित उपाययोजना जाहीर कराव्यात.

जनहितासाठी प्रशासनाने आता जागे व्हावे, अन्यथा निष्काळजीपणाची किंमत मुंबईकरांना जीव गमावून चुकवावी लागू नये!

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात