ताजी बातमी

गंगापूर तालुक्याचे माजी सभापती सुनील केरे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शिल्लेगाव येथून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, कोणत्याही स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक किंवा पक्ष संघटनेला विश्वासात न घेता त्यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतल्याचा निर्णय घेतला. या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.

पक्षाशी आणि कार्यकर्त्यांशी कोणतीही चर्चा न करता घेतलेल्या या निर्णयाचा निषेध करत संतप्त शिवसैनिकांनी सुनील केरे यांना शाईने अंघोळ घालत जाहीर निषेध केला. शिवसैनिकांनी हा निर्णय पक्षाशी गद्दारी करणारा असल्याची भावना व्यक्त करत केरे यांना चांगलाच दणका दिला.

“पक्षाने विश्वास दाखवून उमेदवारी दिली असताना ती अचानक मागे घेणे म्हणजे शिवसैनिकांच्या मेहनतीचा अपमान आहे,” असा संतप्त सूर यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेत अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.

या प्रकारानंतर पक्ष नेतृत्वाकडून कोणती भूमिका घेतली जाते, तसेच सुनील केरे या घटनेवर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात