ताजी बातमी

विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिककेंद्री दृष्टिकोन अधिक मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान हे अत्यंत निर्णायक साधन ठरत असल्याचे मत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. ते लखनौ येथे आयोजित ८६ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत (एआयपीओसी) बोलत होते.

‘पारदर्शक, कार्यक्षम आणि नागरिककेंद्री विधिमंडळ प्रक्रिया घडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर आपले विचार मांडताना अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, संसदीय लोकशाही आज अशा महत्त्वाच्या टप्प्यावर उभी आहे जिथे दीर्घकालीन परंपरा आणि भविष्याभिमुख प्रशासन यांचा समतोल साधणे अत्यावश्यक आहे. बदलत्या काळाच्या गरजेनुसार विधिमंडळाने तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास निर्णयप्रक्रिया अधिक प्रभावी, गतिमान आणि उत्तरदायी होऊ शकते.

डिजिटल परिवर्तन म्हणजे केवळ यांत्रिकीकरण किंवा तांत्रिक बदल नव्हे, तर लोकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिक आणि विधिमंडळ यांच्यातील संवाद अधिक सुलभ, पारदर्शक आणि विश्वासार्ह होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी देशभरातील विविध राज्यांतील पीठासीन अधिकारी उपस्थित होते. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून लोकशाही अधिक बळकट करण्याच्या दिशेने सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मतही या परिषदेत व्यक्त करण्यात आले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात