ताजी बातमी

प्रतीक्षा नगर परिसरातील माला गार्डन समोरील रस्त्यावर अनेक दिवसांपासून साचलेला माती व राडारोड्याचा प्रचंड ढिगारा अखेर हटवण्याच्या दिशेने मुंबई महानगरपालिकेने हालचाल सुरू केली आहे.

ही कारवाई महाराष्ट्र सत्ता TV NEWS ने सातत्याने उचलून धरलेल्या बातम्यांचा परिणाम असून, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष (मीडिया) राहुल जाधव यांच्या प्रभावी पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

या ढिगाऱ्यामुळे परिसरातील नागरिकांना, विशेषतः शाळकरी मुलांना व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघाताचा धोका वाढला होता, तसेच पावसाळ्यात चिखल व धुळीमुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. मात्र, संबंधित यंत्रणा याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता.

हा गंभीर जनहिताचा मुद्दा महाराष्ट्र सत्ता TV NEWS ने ठामपणे मांडल्यानंतर आणि राहुल जाधव यांनी मनपा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर प्रशासन खडबडून जागे झाले. मनपाने प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करत ढिगारा हटवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

“जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि शाळकरी मुलांच्या जीवितासाठी अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये. जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी माध्यमे आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ही कारवाई म्हणजे माध्यमांचा प्रभाव, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि नागरिकांच्या एकजुटीचा विजय असल्याचे बोलले जात असून, भविष्यातही अशा जनहिताच्या प्रश्नांसाठी प्रशासन तत्पर राहील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात