ताजी बातमी

मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन तसेच श्रमिक ब्रिगेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने दरवर्षी सामाजिक, कला, प्रशासकीय व समाजहितासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.


याच परंपरेनुसार १० डिसेंबर २०२५ रोजी, वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व प्रभावी कार्य करणाऱ्या ज्योती मोहिते यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार” प्रदान करण्यात आला.


हा सन्मान नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे आयोजित भव्य समारंभात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.


ज्योती मोहिते यांनी समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांसाठी सातत्याने केलेले कार्य, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी दिलेला संघर्ष, तसेच सामाजिक न्याय, महिलांचे सक्षमीकरण व लोककल्याणासाठी घेतलेली भूमिका याची दखल घेत हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.


हा पुरस्कार केवळ व्यक्तीगत सन्मान नसून समाजसेवेतील निस्वार्थ कार्याला मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील मान्यता असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.


या सन्मानाबद्दल ज्योती मोहिते यांनी संयोजक, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन, श्रमिक ब्रिगेड रिपाई (आठवले गट) तसेच सर्व मार्गदर्शक व जनतेचे मनापासून आभार मानले.


ज्योती मोहिते यांचा हा सन्मान अनेक समाजसेवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जनतेसाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक हाताला बळ देणारा आहे, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात