ताजी बातमी

‼️ प्रश्न जिथे जनतेचा, तिथे मनसेचा आवाज! ‼️

ॲन्टॉपहिल प्रभाग क्र. १७९ मधील रावजी गणात्रा मार्गावर वाहनांच्या वेगामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार केली होती. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन मनसे प्रभाग क्र. १७९ च्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले होते.

मनसेच्या या ठाम मागणीची तात्काळ दखल घेत महानगरपालिकेच्या वतीने काल रावजी गणात्रा मार्गावर गतिरोधक बसवण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी व पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल ॲन्टॉपहिल वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. वायसिंग पाटील साहेब, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी श्री. साळुंखे साहेब व श्री. अनिल पॉल साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

तसेच या कामावर सातत्याने लक्ष ठेवून प्रत्यक्षात गतिरोधक बसवून घेण्याकरिता प्रयत्न करणारे मनसे उपशाखा अध्यक्ष श्री. यासीन शेख, श्री. हैदर अली शेख, श्री. सद्दाम सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनसेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

याच अनुषंगाने शेख मिस्त्री दर्गा मार्गावरील बौद्धिक संपदा कार्यालयाजवळील अत्यंत जीर्ण अवस्थेतील गतिरोधक हटवून तेथे नवीन गतिरोधक बसवण्यात आला असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मनसेची लढाऊ भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

जनतेचे प्रश्न रस्त्यावर न येता मार्गी लावण्याचे काम मनसे सातत्याने करत असून "प्रश्न जिथे जनतेचा, तिथे मनसे" हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात