ताजी बातमी


माजी सैनिक तसेच ठाणे पोलीस दलातील शूर पोलीस कर्मचारी कृष्णा सोनमळे यांनी दुबई येथे पार पडलेल्या Oceanman World Championship स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत 10 किमी ओपन वॉटर स्विमिंग यशस्वीरीत्या पूर्ण करून एक इतिहास रचला आहे.


या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होणारे महाराष्ट्र पोलीस दलातील ते पहिले पोलीस असल्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे ठाणे पोलीस दलाचे आणि संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल झाले आहे.


कठोर शिस्त, प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर तयारीच्या जोरावर सोनमळे यांनी ही अवघड स्पर्धा पूर्ण केली. समुद्रातील लाटांना तोंड देत, अपार धैर्य आणि चिकाटी यांचे दर्शन घडवत त्यांनी 10 किमी अंतर पार केले.


त्यांच्या या भव्य यशाबद्दल ठाणे पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस दल तसेच नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सोनमळे यांची ही कामगिरी पोलीस दलातील इतर जवानांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.






सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात