१० लाखांहून अधिक किमतीचे ५६ चोरीचे मोबाईल फोन हस्तगत; मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई
डोंगरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या चोरीच्या मोबाईल विक्री प्रकरणात मुंबई पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जलदगतीने कारवाई करत मोठे यश मिळवले आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकाने माहितीच्या आधारे सापळा रचून छापा टाकला आणि पंचनाम्याअंतर्गत तीन संशयितांना ताब्यात घेतले.
या कारवाईत तब्बल ₹१०,८९,०००/- किंमतीचे ५६ चोरीला गेलेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीच्या मोबाईल फोनच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचे जाळे उलगडण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई पोलिसांच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.