ताजी बातमी

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचे औचित्य साधून राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या केंद्रबिंदू ठरणारा भव्य कार्यक्रम ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत राज्य प्रदर्शनी समितीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत कार्यक्रमाचे सविस्तर नियोजन, आयोजनात्मक बाबी तसेच प्रदर्शनाचे सादरीकरण यावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम अधिक व्यापक, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हावा यासाठी विविध सूचनांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेत टपाल विभागामार्फत श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या छायाचित्रासह विशेष स्मृतिचिन्ह म्हणून टपाल तिकीट जारी करण्यास संमती देण्यात आली. त्यांच्या अद्वितीय बलिदानाचे स्मरण यामुळे अधिक व्यापक पातळीवर जपले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीस कोकण भवनचे अतिरिक्त जिल्हाधिकारी व समिती सदस्य रविंद्र पवार, राज्य पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष तसेच समितीचे निमंत्रक व कार्याध्यक्ष बल मलकित सिंह, समन्वयक व कार्यकारी अधिकारी डॉ. जगदिश साकवान, सदस्य लढाराम नागवाणी, डॉ. कुलतारसिंह चीमा, जयराम पवार, श्रीनिवास पुलैया, रवींद्र राठोड, तसेच अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या अवर सचिव विशाखा आढाव यांच्यासह राज्यस्तरीय समन्वय समितीचे सदस्य आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या शहिदीतून मानवतेचे जे उदात्त मूल्य आपल्याला मिळाले, त्याचा जागर आजच्या कार्यक्रमांद्वारे सर्वत्र पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात