ताजी बातमी

परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली व अत्याधुनिक कॅन्सर उपचार पद्धतींची माहिती घेतली. सार्वजनिक आरोग्य विभाग व टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ‘कॅन्सर मुक्त महाराष्ट्रा’चा संकल्प प्रत्यक्षात आणूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रसंगी टाटा मेमोरियल सेंटरचे ऑल इंडिया डायरेक्टर डॉ. सुदीप गुप्ता, हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. सी. एस. प्रमेश, डेप्युटी डायरेक्टर श्रीखंडे व सिद्धनाथ लष्कर, तसेच रुग्णालय सुपरिटेन्डन्ट डॉ. विनीत सामंत उपस्थित होते.

राज्यात वाढत्या कॅन्सर रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून तपासणी व उपचार मोहिमा सुरू आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पॅकेज दरवाढीचा लाभ कॅन्सर रुग्णांनाही होणार असून, खासगी रुग्णालयांनीही या योजनेअंतर्गत उपचारानंतरची सेवा प्रभावीपणे पुरवावी, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटलच्या साहाय्याने राज्यात २६ ठिकाणी डे-केअर सेंटर सुरू करण्याचे काम गतिमान असून त्यामुळे जिल्हास्तरावर ग्रामीण रुग्णांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात