उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील नागरी सेवा-सुविधा याबाबतची आढावा बैठक पार पडली
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, निरनिराळी कामे तसेच नागरी सेवा-सुविधा याबाबतची आढावा बैठक केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री तथा स्थानिक खासदार श्री. पीयूष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरिवली स्थित आर मध्य विभाग कार्यालयात आज पार पडली.
आमदार श्री. प्रवीण दरेकर, आमदार श्रीमती मनीषा चौधरी, आमदार श्री. योगेश सागर, आमदार श्री. संजय उपाध्याय, आमदार श्री. प्रकाश सुर्वे, माजी आमदार श्री. भाई गिरकर यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त श्री. संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त श्री. विक्रम कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. सौरभ कटियार, मुंबई पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (उत्तर) श्री. शशीकुमार मीना, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनसंरक्षक आणि संचालक श्रीमती अनिता पाटील यांच्यासह महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांचे संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.