ताजी बातमी

मुंबई (एफ उत्तर/विभाग): सायन येथील हिंदू स्मशानभूमीतील पुरुष शौचालय म्हणजे एक दुर्गंधीचा नरक! तिथे पाऊल ठेवले की श्वास घेणं सुद्धा कठीण होतं. घाण, कीटक, तुटलेले नळ, साचलेले पाणी — हे सगळं पाहून कोणालाही उलटी येईल अशी अवस्था आहे.

आश्चर्य म्हणजे, एफ /उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रोज आपल्या खुर्चीत बसून “स्वच्छ मुंबई”च्या घोषणांचा ढोल पिटत असतात, पण त्यांच्या विभागातील हे शौचालय पाहिलं तरी वाटतं — हीच का तुमची स्वच्छता मोहिम?

सायन स्मशानभूमीत दररोज सायन, धारावी, शिव कोळीवाडा आणि वडाळा येथून शेकडो नागरिक अंत्ययात्रांसाठी येतात. त्या ठिकाणी लोकांना माणसालायक शौचालय सुद्धा नाही! अशा स्थितीत प्रशासनाची लाज वाटावी!

नेहमीप्रमाणे “दुरुस्ती चालू आहे” हे एकच बहाणे देऊन मनपा अधिकारी आपली जबाबदारी झटकतात. पण नागरिक विचारतात —

???? मग ही “दुरुस्ती” कधी संपणार?

???? नागरिकांना असा त्रास देणं थांबवणार कोण?

???? आणि या दुर्गंधीत प्रशासनाला काही सुगंध येत नाही का?

एफ /उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त व संबंधित स्वच्छता अधिकारी हे या दुर्दशेला थेट जबाबदार आहेत.

ही केवळ निष्काळजीपणा नाही — हा जनतेच्या आरोग्यावर आणि सन्मानावर थेट प्रहार आहे!

स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की:

हे शौचालय तातडीने बंद करून नवे व आधुनिक शौचालय बांधण्यात यावे.

स्वच्छता कर्मचार्‍यांवर व विभागीय अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाई करावी.

“स्वच्छ भारत”चा फलक काढून “अस्वच्छ प्रशासन” असा नवा फलक लावावा!

“मनपा अधिकारी फक्त उद्घाटनाला फोटो काढायला येतात, पण दुर्गंधी आणि घाणीकडे पाठ फिरवतात!” — स्थानिक नागरिकांचा संतापजनक उद्गार.

मुंबई मनपा प्रशासनाचे एफ/ उत्तर विभाग आता नागरिकांच्या संयमाशी खेळणे थांबवा — अन्यथा लोक स्वतः रस्त्यावर उतरतील!

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात