नरेडको महाराष्ट्रने नेरळ-कर्जत युनिट सुरू केले १०० हून अधिक सदस्यांद्वारे ४० हजारहून अधिक परवडणारी घरे
दोन आठवड्यांपूर्वी अंबरनाथ-बदलापूर युनिटच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, नरेडको, या रिअल इस्टेट उद्योगांच्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संघटनेच्या महाराष्ट्र चॅप्टर, नरेडको महाराष्ट्रने राज्यात ‘नरेडको नेरळ-कर्जत’ हे नवीन युनिट सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे १०० हून अधिक सहयोगी सदस्यांमार्फत ४० हजारहून अधिक परवडणारी घरे उभी होऊ शकतील. यामुळे परवडणाऱ्या घरांची मालमत्ता उपलब्ध होईल व घरखरेदीदारांना नेरळ आणि कर्जत भागात ‘रेरा’ नोंदणीकृत मालमत्ता परवडणाऱ्या दरात खरेदी करता येतील.
नेरळ-कर्जत हे मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणांच्या मध्यभागी आहे. राज्य महामार्ग नेरळला कर्जत, NH-4, पनवेल आणि बदलापूरला जोडतो. माथेरान हिल स्टेशन हे या प्रदेशातील महत्त्वाचे पर्यटक आकर्षण आहे. एकदा पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीची कमतरता असलेल्या नेरळ-कर्जत येथे आज सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. नेरळ-कर्जत मधील रिअल इस्टेट विकासास उत्तेजन देण्यासाठी सरकारकडून अनेक मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स उभारले जात आहेत. तसेच, अंबरनाथ-बदलापूर आणि कल्याणनंतर या भागास ‘पुढचे मोठे रहिवासी केंद्र’ म्हणून ओळखले जात आहे.
हे युनिट सुरू करताना श्री. अशोक मोहनानी – अध्यक्ष, नरेडको महाराष्ट्र म्हणाले की, "नरेडको चे नेरळ-कर्जत हे नवीन युनिट सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आपले स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या खरेदीदारांसाठी परवडणाऱ्या घरांचा नवा पुरवठा उपलब्ध होऊ शकेल. नरेडकोच्या छत्राची घरखरेदीदारांनादेखील जाणिव व विश्वास आहे. यामुळे 'हाऊसिंग फॉर ऑल बाय २०२२', या सरकारी धोरणाला बळ मिळेल."
मोठ्या महानगरांमधील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे दूरवरच्या स्थळांनादेखील संलग्नता मिळते. यातूनच अशी दूरवरची स्थळे व शहर यांच्यातील दरी मिटली जाते. त्याचवेळी दुसरीकडे, मेट्रो रेल्वे, रिंग रोड व महामार्ग यासारख्या प्रकल्पांमुळे शहरांना संलग्नता प्राप्त होते व त्यामुळेच बजेटचा विचार करणाऱ्या घरखरेदीदारांसाठी ही जागा अधिक सोईस्कर होईल.
याप्रसंगी श्री गौतम ठाकर, अध्यक्ष, नरेडको नेरळ-कर्जत युनिट म्हणाले की, "नेरळ-कर्जत क्षेत्रात खरेदीदारांसाठी मुंबई, ठाणे व नवी मुंबईच्या तुलनेत स्वस्त घरे आहेत. या भागामध्ये निम्न-उत्पन्न-क्षेत्रातील खरेदीदारांसाठी अनेक परवडणारी घरे आहेत आणि घर खरेदीदार तसेच दुसऱ्या घरांच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. स्थावर मालमत्तेच्या घरांच्या किमती दुरुस्त होत असताना, या क्षेत्रातील आगामी पायाभूत सुविधा, निसर्ग सौंदर्य व परवडणाऱ्या किमती, यामुळे घर खरेदीदारांचे स्वप्न प्रत्यक्षात येईल."
या युनिटच्या उद्घाटन कार्यक्रमाला नरेडकोचे ज्येष्ठ नेते जसे, डॉ. निरंजन हिरानंदानी, राष्ट्रीय अध्यक्ष, नरेडको; श्री. राजन बांदेलकर, उपाध्यक्ष, नरेडको महाराष्ट्र; श्री. संदीप रुणवाल, निवडून आलेले अध्यक्ष, नरेडको महाराष्ट्र; श्री. प्रशांत शर्मा, सचिव, नरेडको महाराष्ट्र; श्री. कमलेश ठाकूर, सह सचिव, नरेडको महाराष्ट्र; मौलिक दवे, सह कोषाध्यक्ष, नरेडको महाराष्ट्र यांच्यासह नरेडको नेरळ-कर्जत युनिटचे सदस्य उपस्थित होते.
मुंबईच्या दृष्टीक्षेपात असल्याने नेरळ-कर्जत क्षेत्राने मागील काही वर्षात मोठी वाढ अनुभवली आहे. विविध रोजगार केंद्रांच्या निकटतेमुळे या भागात अलिकडच्या वर्षांत लोकसंख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना या भागात परवडणारी घरे मिळत असल्याने रिअल इस्टेटच्या दृष्टीने पुरेशी मागणी येथे कायम असते. त्यामुळेच नोकरीच्या संधींनादेखील मोठा वाव मिळतो. नेरळ-कर्जत व त्या आजुबाजूचा भाग केवळ घरासाठी सुंदर नसून हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळदेखील आहे. मोठी जागा व आल्हाददायी वातावरण, हे लोकांकडून मालमत्तेत गुंतवणूक होण्याचे मुख्य कारण आहे. सप्ताहअखेरीस मजा करण्यासाठी अथवा मिळकतीचे अन्य साधन म्हणून घरे भाडेतत्वावर देता येतात. हे सर्व घटक या क्षेत्रातील वाढीला मागील काही वर्षात कारणीभूत ठरले आहेत. मालमत्तांच्या दरांचा विचार केल्यास, याद्वारे पुढील काही वर्षात चांगला परतावा अनुभवता येईल. वेगवान पायाभूत सुविधांचा विकास आणि उदयोन्मुख रिअल इस्टेट प्रकल्पांमुळे, नेरळ-कर्जत हे मुंबईकरांच्या पसंतीचे ठिकाण बनत आहे.