जालना येथे कोरोना पार्श्वभूमीवर आढावा बैठक : आरोग्य मंत्री राजेश टोपे
कोव्हीड19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांबरोबरच लसीकरणही तेवढेच महत्वाचे आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये लसीकरणासाठी नागरिक पुढे येताना दिसुन येत नाहीत. जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी अधिक प्रमाणात वाढावी यासाठी लसीकरणाबाबत होर्डिंग,समाजमाध्यमे, हँडबील, केबलनेटवर्क यासारख्या माध्यमांचा वापर करुन व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होणार नाही याची दक्षता घेऊन लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करणे,जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर हा आजघडीला जरी कमी असला तरी हा दर भविष्यात वाढु नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे,जिल्ह्यात स्वॅब तपासणीसाठी अद्यावत व स्वतंत्र अशी लॅबची उभारणी करण्यात आली असुन या लॅबचा कार्यक्षमतेने उपयोग करण्यात येऊन दरदिवशी 2 हजारापेक्षा अधिक चाचण्या या लॅबच्या माध्यमातुन झाल्याच पाहिजेत यादृष्टीकोनातुन आवश्यक ते नियोजन करणे,राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत. विनामास्क कोणीही फिरणार नाही, यादृष्टीने काळजी घेत शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घेणेबाबत प्रशासनाला निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद मनुज जिंदाल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे,निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,उप विभागीय अधिकारी संदीपान सानप,उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव,उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती भोसले,जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसेय्ये,जिल्हा शल्यचित्किसक डॉ.अर्चना भोसले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर, कल्याणराव सपाटे,डॉ. संजय जगताप,नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, अन्न व औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.